कबीरांनी ‘ढाई आखर प्रेम का’ म्हटलंय, पण गेल्या काही वर्षांत आपण द्वेषाची अडीच अक्षरं जवळ केलीयत की काय असं वाटू लागलंय!
हिटलरचं ‘अडॉल्फ’ हे नाव लोक जेव्हा पुन्हा एकदा, सहजपणे, आपल्या मुलांना देऊ लागतील, त्यावेळी त्या नावामागचं, आणि दुसऱ्या महायुद्धातलं क्रौर्य आपण मागे टाकलं असेल, ते कालबाह्य झालेलं असेल, असं एक विधान मी हॅरी म्युलिश यांच्या ‘असॉल्ट’ या कादंबरीत वाचलं होतं. दुर्दैवाने हे विधानच उलट्या दिशेने कालबाह्य केलं गेलंय. आता युरोपमधले काहीजण आपल्या मुलांची नावं अभिमानाने अडॉल्फ ठेवू लागलेयत .......